
सावंतवाडी : 'आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!' 'स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!', असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी नुकतीच परिसर स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा आदर्श संस्कार रुजविण्याचे महत्वपूर्ण काम केले. आता २६ जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनी सर्वोदय नगरातील सर्व रहिवाशी बांधवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी सायंकाळी ७ वाजता मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी लहान बालकांपासून आबाल वृद्धांना आपल्या अंगी असलेल्या विविध कला, गुण प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. यात गायन, वादन, मिमिक्री, नृत्य, नकला, एकपात्री प्रयोग, आदी कला गुणांची उधळण रहिवाशी बांधव करणार आहेत. तरी रहिवाशी बांधवांनी सहभागी होण्यासाठी आपली नावे २५ जानेवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सौ. मेघना राऊळ ( मोबाईल क्र. 9423219781) यांच्याकडे द्यावीत. स्नेह संमेलनानंतर स्नेह भोजन देखील आयोजित केले असून जास्तीत जास्त सर्वोदय नगरमधील रहिवाशी बांधवांनी यात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सर्वोदय नगर रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक व सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन सुनील राऊळ, मेघना राऊळ, अजय गोंदावळे, सचिन नाटेकर, विश्वेश नाईक, अरुण पडवळ, वासुदेव शिरोडकर, रामदास कोरगावकर, ॲड. प्रकाश परब, उषा परब, आत्माराम नाईक, मीना सावंत, विद्याधर तावडे, प्रा. रुपेश पाटील, लक्ष्मीकांत कराड, लाडोजी सावंत, मच्छिंद्र मुळीक, विजय चव्हाण, पुंडलिक राणे, ॲड. राणे, शिवाजी गावित, प्रणाली नाईक, धनंजय डुबळे, प्रा. सुधीर बुवा, शांताराम गावडे, संजय नार्वेकर, आर. एस. पाटील, विनीत तावडे, डॉ. अंकिता तावडे, ओवी तावडे, हार्दिक तावडे, विजय नाटेकर, संतोष मठकर, विनायक चव्हाण, श्रीकांत राऊळ, हायजिन लुईस फिलिप्स, मोहन पिळणकर, बाजीराव शिंत्रे, प्रदीप कोरगावकर, अशोक कोरगावकर, दीपक एंडेकर यांसह तमाम सर्वोदय नगरातील रहिवासी बंधू भगिनी यांनी केले आहे.