दोडामार्ग : पुनर्वसन होवून अनेक वर्षे लोटली. मात्र नुकसान भरपाई बाबत पाठ पुरावा करुन देखील शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली नसल्याने शिरंगे पुनर्वसन ग्रामपंचायत बोडण कार्यालय येथे २६ जानेवारी रोजी उपोषण करणार असा इशारा शिरंगे पुनर्वसन ग्रामस्थ अंकुश गवस, विश्वनाथ घाडी, बाळकृष्ण गवस यांनी पत्रकार परिषद घेत दिला आहे.
दोडामार्ग येथील सोनचाफा येथील हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत विश्वनाथ घाडी, बाळकृष्ण गवस बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र- गोवा यांच्या संयुक्त तिलारी आंतरराज्य प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावाचे पुनर्वसन होवून गेली तेवीस वर्षावून अधिक काळ लोटला मात्र पुनर्वसन होते वेळी शिरंगे वासियांची काही घरे, मांगर, गुरांचे गोठे, पिढ्यान् पिढ्या पूर्वज कालीन आठवणी सामावून ठेवण्यात आलेली झाडे व जमीन यांची नुकसान भरपाई नदेता जबरदस्ती शिरंगे वसियांचे पुनर्वसन करण्यात आले. संयुक्त मोजणी करुन नंतर रक्कम दिली जाईल असे सांगितले मात्र रक्कम काही दिली नाही.आणि नंतर तो प्रस्तावच रद्द केला गेला. आपले पुनर्वसन मोकळ्या जागेत करावे अशी मागणी शिरंगे वासियांची होती याचा विचार नकरता घाईगडबडीत लोकांचे स्तलांतर केले गेले. भूसंपादन प्रस्ताव क्रमांक ८८ १० ८० ८५ ८६ एकुण तीन जाहिर केलेल्या निवाड्यात फळझाडे,वनझाडे, व बांधकामे यांची फेर मोजणी संयुक्त प्रस्ताव व सन १९९८ संयुक्त मोजणी प्रस्तावातील रक्कम न मिळाल्याने तसेच सदर प्रस्ताव रद्द केल्याने गेले तीन महिने त्या संबंधी अनेक प्रश्न विचारून पत्रव्यवहार देखील करण्यात आले. मात्र समर्पक उत्तरे मिळत नसल्याने शासनाचे लक्ष वेधत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिरंगे पुनर्वसन वासिय उपोषण करणार आहेत.
घर का ना घाट का ; शिरंगे पुनर्वसनवासियांची अवस्था
वडिलोपार्जित जमिनी शासनाने बळकावत घरे बांधण्यासाठी प्लॉट देण्यात आले. मात्र वाढती लोकसंख्या पाहता कुटुंबात वाढ होऊ लागली. देण्यात आलेले प्लॉट अपुरे पडू लागले. त्यात शेतकऱ्यांच्या हाती शेतजमीनी नसल्याने शेतकरी बेरोजगार झाला. रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने बेरोजगारी ही पुनर्वसन वासियांची मोठी समस्या बनली. पुनर्वसन मुळे शिरंगे येथील मूळ गावी असलेल्या जमिनी, घरे, झाडे अशा सर्व गोष्टींचा त्याग पुनर्वसन वासियांना करावा लागला. मात्र शेवटी हाती काहीच उरले नाही. घर का ना घाट का अशी परिस्थिती पुनर्वसन वासियांची झाली.