
दोडामार्ग : प्रधानमंत्री कृषी सिंचन विकास योजनेतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा पाणलोट कक्षाच्या वतीने बोडदे शाळेत जन जागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रतंर्गत शाळेच्या मुलांनी पाणी वाचवा या विषयावर निबंध, चित्र कला, काव्य वाचन स्पर्धेत भाग घेतला. तसेच गावातील महिलांनी रांगोळी काढल्या. तसेच शाळेच्य वतीने प्रभात फेरी काढून जन जागृती केली.
शाळेच्या श्रुती संदिप नाईक हिने सादर केलेले पाणी महत्वाचे काव्य तालुका स्तरावर निवडण्यात आले. मुलांच्या शैक्षणिक प्रगती बाबत मान्यवरांनी कौतुक केले. तसेच या निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला पद्माकर आपटे ( जल संधारण अधिकारी ), नितीन सावंत ( प्रकल्प समन्वयक ), अनिल गाड ( कृषी तज्ज्ञ ), नितेश मठकर, अक्षरा नाईक ( समुह संघटक ) उपस्थित होते. तसेच रुपाली प्रविण गवस, दिपिका घाडी, मयेकर ग्रा. प. सदस्य, अश्विनी गवस, स्नेहा गवस ह्या कार्यक्रमाला हजर होत्या.
कार्यक्रमाला गावचे सरपंच हरिश्चंद्र नाईक यांनी भेट देवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शाळेच्या शिक्षिका मंजुश्री परब व मुख्याध्यापक महेश नाईक यांनी सहकार्य केल्या बद्दल पाणलोटच्या समुह संघटक अक्षरा नाईक यांनी आभार मानले.