
दोडामार्ग : समाजसेवा हायस्कूल कोलझरचे कला शिक्षक प्रसाद राणे यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांनी घेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावचे ते सुपुत्र. बीए, एटी, डी. ए. एम, असं त्याचं शिक्षण आहे. धी. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर कुडासे इथं 14 नोव्हेंबरला नियुक्त झाले. तर २०१४ पासून समाजसेवा हायस्कूल कोलझर मध्ये कार्यरत आहेत. कला विषयासह त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं.