
दोडामार्ग : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने नूतन विद्यालय कळणे येथे भारत मातेच्या शुरविर सुपुत्रांचा सन्मान सोहळा "शौर्या तुला मी वंदितो " या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 19 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. रक्ताच दान आणि प्राणच बलिदान देऊन पारतंत्र्यात अडकलेल्या आपल्या भारत मातृभूमीला स्वतंत्र करण्याचा माझ्या शूर वीरांना शतशत प्रणाम! या माझ्या स्वातंत्र्य लढ्याने कैक जणांनी हौतात्म्य पत्करले तेव्हाच या भारत भूमीने मुकत्तेचा श्वास घेतला आणि भारत स्वतंत्र झाला.
भारत मातेच्या शूरवीर सुपुत्रांचा सन्मान सोहळा " शौर्या तुला मी वंदितो" हा कार्यक्रम नूतन विद्यालय कळणे येथे रविवारी सकाळी 9 वाजता होणार आहे. ज्यांनी या मातृभूमीसाठी आपले रक्त सांडून बलिदान दिलेल्या तसेच सेवा निवृत्त झालेल्या समर सेनानिंचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे.
आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक ' मार्फत शौर्य गीताचे गायन
नूतन विद्यालय कळणे संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य मोहनराव देसाई यांच्या प्रेरणेतून सूप्रसिद्ध सिनेगायक स्वप्नील बांदोडकर व नूतन विद्यालय कळणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक ' ची स्थापना करण्यात आली. येथे कळणे शाळेतील संगीत क्षेत्रातील अलंकार पदवी धारक प्रसाद गोसावी शिक्षक संगीताचे धडे देत असून आयडियल स्कूलमध्ये प्रामुख्याने शाळेतील तसेच बाहेरील विद्यार्थी संगीताची विद्या घेत आहे. कळणे विद्यालयातील विद्यार्थी आपल्या गायनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी सादर करीत असतात. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यक्रम प्रसंगी येथील विद्यार्थी शौर्य गीताचे गायन करणार आहेत. आयडीयल स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, प्रसाद पोकळे , कळणे पंचक्रोशी शि.प्र.मंडळ सदस्य नीरज देसाई यांचे मार्गदर्शन लाभते.
19 जानेवारी सकाळी 9 वाजता मल्लखांब प्रात्यक्षिके, 10 वाजता लाठी काठी प्रात्यक्षिक,10:30 वाजता नाश्ता , 11.30 वाजता *एकपात्री अभिनव आणि नृत्य, 12 वाजता माझी सैनिक, गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान तर दुपारी 1:30 वाजता स्नेह भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान तसेच मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी केले आहे.