दोडामार्ग : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत हळबे महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी गोव्यातील नवोदित लेखिका समृद्धी केरकर व प्राध्यापक गाथाडे यांची पत्रकार समीर ठाकूर यांनी घेतली मुलाखत या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. आजच्या नवोदित विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करून त्यावर मांडणे अत्यावशक असल्याचा संदेश त्यांनी मुलाखतीतून दिला.
लेखिका समृद्धी केरकर यांनी त्यांच्या एकूणच लेखन प्रवासाबद्दल, साहित्य निर्मितीमागील प्रेरणा यावर भाष्य केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयावर लिहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर प्रा. गाथाडे यांच्या मुलाखतीत त्यांचे साहित्य, संशोधन शैक्षणिक क्षेत्रातील आपले अनुभव मांडले. तसेच आपल्या लिखाणाचा फायदा समाजाला झाला पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्रा. राजेंद्र केरकर यांनी आजच्या युवकाने वेगवेगळ्या विषयावर वाचन, मनन, आणि चिंतन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच दोडामार्ग तालुक्यातील गावातील विविध प्रश्न अभ्यासले पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य सुभाष सावंत यांनी ग्रंथालय विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमावर प्रकाश टाकत साहित्य क्षेत्राला प्रेरणा देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ग्रंथालय विभाग प्रमुख रामकिसन मोरे यांनी केले. तसेच यावेळी प्रा. डी. वाय. बर्वे, प्रा. पी. एन. ढेपे, प्रा. डॉ. एस. यु. दरेकर, प्रा. डॉ. आर. एस. इंगळे, प्रा. डॉ. एस. एन. खडपकर, प्रा. भाग्यश्री गवस, प्रा. रोहन बागकर, प्रा. दर्शनी कोटकर, प्रा. शेफाली गवस, योगेश ठाकूर, कल्पेश गवस सर्व विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया गवंडळकर हिने तर उपस्थितांचे आभार डिम्पल राजपुरोहीत हिने मानले.