सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे च्या सह्याद्रि आय.टी आय.च्या मेकॅनिक डिझेल ट्रेडचे "व्हील बेरो" (Wheel Bero) ह्या मॉडेलची जिल्हातील दहा सर्वोत्कृष्ट तांत्रिक मॉडेलमध्ये निवड झाली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक मॉडेल प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्हातील शासकीय व अशासकीय अशा एकुण दहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी सहभाग घे वून 39 तांत्रिक मॉडेलची मांडणी केलेली होती. त्यापैकी दहा सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड करावयाची होती. त्यामध्ये दरवर्षी प्रमाणे सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे सहभागी होवून यावर्षी सुध्दा घवघवीत यश संपादन केले आहे.
सह्याद्रि आय.टी.आय.सावर्डे मधून आर.ए.सी ट्रेडचे मिनी डीसी एअर कुलर व मेकॅनिक डिझेल ट्रेडचे व्हील बेरो (Wheel Bero) या दोन मॉडेलची मांडणी करण्यात आली होती. त्यापैकी मेकॅनिक डिझेल ट्रेडचे व्हील बेरो (Wheel Bero) ह्या मॉडेलची जिल्हातील दहा सर्वोत्कृष्ट तांत्रिक मॉडेलमध्ये निवड झाली आहे. त्याबद्दल मॉडेल तयार करणारे प्रशिक्षणार्थी तसेच मार्गदर्शक मेकॅनिक डिझेल ट्रेडचे निदेशक प्रथमेश पाटील यांचे अभिनंदन संस्थेचे कार्याध्यक्ष, आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश माहाडिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सुर्वे, सर्व सदस्य तसेच आय.टी.आयचे प्राचार्य उमेश लके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.