
दोडामार्ग : कुडासे हायस्कूलचे कार्य कौतुकास्पद - उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांनी आज्ञाधारक असले पाहिजे. आई - वडील आणि गुरुजनांचा सल्ला तुमचे जीवन समृद्ध करेल. पालक जे सांगतात ते आचरणात आणा यश कुठेही गेलेलं नाही. असा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुजा सावंत यांनी दिला. कुडासे हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष नाईक, माजी मुख्यध्यापक मातोश्री सरलाबाई, म्हात्रे विद्यालय डोंबिवली व्यासपीठावर मुख्याध्यापक शेडगे, उत्तम सावंत, दादा देसाई, शिक्षक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे उत्तम सावंत बोलताना म्हणाले की शालेय वयात मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे. विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे, त्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत. त्यांची चरित्रे अभ्यासा. विद्यार्थ्यांनी आई-वडील, समाजाचे, शाळेचे ऋण कधीही विसरू नये, आळस झिडकारून कामाला लागा. मी वडिलांना आपला अभिमान वाटेल असे काम करा असा सल्ला सावंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करताना बक्षीसपात्र मुलांची यादी एस व्ही देसाई, शाळेचा वार्षिक अहवाल बी पी किल्लेदार सर यांनी, तर क्रीडा अहवाल सोमनाथ गोंधळी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर डेगवेकर यांनी, तर दिपाली पालव यांनी आभार मानले.