दोडामार्ग : गेले अनेक दिवस हेवाळे परिसरात उच्छाद घालणाऱ्या हत्तीने घाटीवडे येथील वेंकटेश देसाई यांच्या सुपारी, नारळ, केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे त्यांचे हजारो रुपयाचे नुकसान झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेवाळे परिसरात टस्कर हत्तीने येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करण्यास सुरवात केली आहे. दिवस रात्र होणारे नुकसान पाहता शेतकरी मेटाकुटीस पावला आहे. रक्ताचे पाणी करून उभी केलेली शेती डोळ्या देखत उधवस्त होत आहे. त्यात शासनाकडून मिळाणारी तूट पुंजी रक्कम पाहता त्या नुकसानीची मजुरी पण उभी होत नाही. त्यामुळे इथला शेतकरी हवालदीत झाला आहे.
आता शासनाने या हत्तीचा बंदोबस्त करायलाच हवा इथल्या आताच्या नवीन आमदार खासदार यांनी जातीनीशी लक्ष घालून हंत्ती हटाव मोहीम राबवावीच अशी मागणी आता इथला शेतकरी वर्ग करत आहे.