'त्या' पट्टयात पुन्हा डांबरीकरण !

जन आक्रोशानंतर न.प., ठेकेदार वठणीवर
Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2025 19:00 PM
views 357  views

सावंतवाडी : शहरातील प्रमुख रस्त्यांच झालेल्या निकृष्ट कामामुळे खड्डेमय मार्ग तयार झाले होते. अखेर त्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. निकृष्ट कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून पुन्हा डांबरीकरण करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहरातील व्यापारी शिष्टमंडळ, सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यातनंतर तुर्त खड्डे बुजविण्यात आले होते. आजपासून खड्डेमय पट्टयात पुन्हा डांबरीकरण करण्यात येत आहे.

बाजारपेठेतील नव्या रस्त्यांवर पावसाच्या तोंडावर खड्डे पडले होते. यामुळे वाहतूकीस त्रास निर्माण झाला होता. यावरून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच शिष्टमंडळ, बाजारपेठीतल व्यापारी वर्गांच शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांचा चांगलच धारेवर धरले होते. निकृष्ट काम झालेलं असताना ठेकेदाराच बील अदा कसं केलं गेलं ? यावरून खडेबोल सुनावले होते. दरम्यान, शहरातील या खड्डेमय रस्त्यावर पुन्हा डांबरीकर करण्याचे काम ठेकेदारान केलं आहे‌. जन आक्रोशाची दखल घेत नगरपालिकेन ही कामे ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता त्रास सहन करावा लागणार नाही आहे.