सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी अँड.आरती पवार

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2025 12:39 PM
views 456  views

सावंतवाडी : 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी अँड.आरती पवार यांची निवड झाली. त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.


यापूर्वी अँड.आरती पवार यांनी सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक अभिरक्षक या पदी काम पाहिले आहे. आता ते सिंधुदुर्ग जिल्हामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणार आहेत. सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेसाठी अँड.आरती पवार यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे त्या पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करण्यात यशस्वी झाल्या. यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यापदी अँड.आरती पवार यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.