सेवानिवृत्त संघटनेच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी 'शरद नारकर' यांची निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 26, 2024 16:11 PM
views 84  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शरद नारकर, सरचिटणीस पदी नितीन जठार व  राज्य प्रतिनिधी म्हणून रुबाब फकीर यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांनी ही निवड जाहीर केली.

  श्री.नारकर हे काही महिन्यांपूर्वी सेवावृत्ती झाले.तत्पुर्वी त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक या पदांवर काम केले. ते शिक्षक पतपेढीचे संचालक देखील आहेत. तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.