प्राथमिक शाळा सावर्डे ठरली चॅम्पियन्स ऑफ सह्याद्री

Edited by: मनोज पवार
Published on: December 26, 2024 11:08 AM
views 142  views

 सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्राथमिक शाळा सावर्डे 'चॅम्पियन्स ऑफ सह्याद्री' चा बहुमान पटकावला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागातील सर्व शाळा 'सह्याद्री क्रीडा संग्राम' मध्ये सहभागी झाल्या होत्या.यात प्राथमिक शाळा सावर्डेने सहापैकी पाच क्रीडा प्रकारांमध्ये विजेतेपद पटकावले.मुलांच्या 50 मीटर धावणे स्पर्धेत तन्मय राजेंद्र घाग याने तर मुलींच्या 50 मीटर धावणे स्पर्धेत आर्या विश्वास शिंगण हिने विजेतेपद पटकावले.

 रिले स्पर्धा, मुलांची लंगडी स्पर्धा व मुलींच्या लंगडी स्पर्धेत शाळेने विजेतेपद मिळवले. या सर्व खेळाडूंना शकील मोडक, सुहास भंडारी, रसिका सुर्वे, अनिल रेडेकर, प्रणिता दिंडे, प्रणित राजेशिर्के, अक्षता घाग,सेजल साळवी, सोनाली राठोड, पूनम चांदेकर, स्मिता सावंत, रुपाली कुंभार, गायत्री वनकुते, सायली शिर्के, गायत्री साठे, योगिता मोहिते, मनीषा शिंदे, संपदा नेटके,सतीश वारे यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या या यशाबद्दल आमदार शेखर निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, मारुती घाग, चंद्रकांत सुर्वे, शांताराम खानविलकर, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, महेश महाडिक, पूजा निकम, प्रशांत निकम, युगंधरा राजेशिर्के, प्रकाश राजेशिर्के, राजेंद्र वारे, संजय वरेकर यांनी अभिनंदन केले.