
देवगड : देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीची निवडणूक नुकतीच देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे पार पडली.यावेळी समितीच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबईच्या स्थानिय समितीच्या सर्व नूतन पदाधिकारी व संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यामध्ये देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई या संस्थेच्या स्थानिय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. एन. बोरफळकर यांची,तर सचिवपदी ॲड. अविनाश माणगावकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर प्रशाला आवारात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
त्याच बरोबर देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबईच्या स्थानिय समितीच्या नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी अर्चना नेने, खजिनदारपदी द. म. जोशी यांची, तर संचालकपदी अनुश्री पारकर, मिलिंद कुबल, चंद्रकांत शिंगाडे, ॲड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, डॉ. पुष्कर आपटे, दयानंद पाटील, विलास रूमडे यांची निवड करण्यात आली आहे.