चिरेखाण संघटना बंद करण्याचा निर्णय

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 19, 2024 15:00 PM
views 645  views

देवगड : चिरेखाण संघटना बंद करण्याचा निर्णय देवगड तालुका चिरेखाण संघटनेतील सभासदांच्या एकमताने घेण्यात आला. देवगड तालुका चिरेखाण संघटनेतील सर्व व्यावसायिक सभासदांच्या एकमताने संघटना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ही सभा विनायक उर्फ पिंटू आचरेकर यांच्या निवासस्थानी संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या सभेमध्ये सर्वानुमते चिरेखाण संघटना बंद करावी असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांनी दिली. या सभेला सचिव काका जेठे, खजिनदार बाबा कोकरे तसेच किरण टेंबुलकर, संजय बोडेकर, बबन बोडेकर, विनायक आचरेकर, रूपेश खोत असे 33 चिरेखाण व्यावसायिक आदी उपस्थित होते.