
दोडामार्ग : पोलिस पाटील दिनाचे औचित्य साधून झरे 2 ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या आयनोडे व सरगवे पोलीस पाटील यांना झरे 2 च्या सरपंच श्रुती देसाई यांच्या संकल्पनेतून सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व माजी शिक्षक लक्ष्मण सावंत, मधुकर सावंत यांच्या हस्ते झरे 1 पोलीस पाटिल श्वेता आयनोडकर व झरे 2 पोलीस पाटिल प्रमोद सावंत या दोघानाही सन्मानित करणेत आले. यावेळी सरपंच सौ. देसाई, उपसरपंच आयनोडकर, श्री. कोरगांवकर, उल्हास सावंत ग्रा. प. सदस्य, ग्रामसेवक जनार्दन पाटिल आदी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करत पोलीस पाटिल आयनोडकर यांनी सरपंच श्रुती देसाई यांचे विशेष आभार मानले. आपण महिला पोलीस पाटील म्हणून गेली 12 वर्षे सेवेत आहेत. मात्र आजवर आपल्याला कोणी सन्मानित केलं नाही. या दोन वर्षात मात्र सरपंच मॅडम आमची आठवणीन आठवण करतात. मान सन्मान करतात. या सर्व पोलीस पाटील यांच्या पदाचा सन्मान असं मी समजत असल्याच्या श्वेता आयनोडकर म्हणाल्या.