दोन पूर्वस देवस्थानचा २५ डिसेंबरला जत्रोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: December 18, 2024 15:55 PM
views 154  views

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी, दुपारी महाप्रसाद सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजत गाजत आगमन त्यानंतर श्रीदेवी माऊलीची ओटी भरणे दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे अधिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रात्री पालखी मिरवणूक व रात्री उशिरा खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या जत्रोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.