राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत प्रकाश केळुसकर प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: December 18, 2024 13:48 PM
views 172  views

सावंतवाडी : राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा, ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद, बीड यांच्या वतीने घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये श्री . प्रकाश शंभा केळुसकर ( गुरुजी )आंबेगाव-सावंतवाडी  यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानिमित्त त्यांना प्रशस्तीपत्र ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि रोख रक्कम रुपये ५००० देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये एकूण ६७ जणांनी सहभाग घेतला होता.

त्याप्रसंगी सत्कार करताना ह.भ.प. गुरुवर्य सुदर्शन महाराज सांगवीकर, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड आर .डी .येवले, प्रा. हरिश्चंद्र बोडखे, पांडुरंग गर्जे, अँड. बाळासाहेब बोडखे , खिळदचे सरपंच डॉ. श्रीराम गर्जे, महंत काशिनाथ महाराज शास्त्री आणि मुख्याध्यापक चंद्रकांत लोखंडे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.