
खेड : जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग खेड व सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुळवंडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने52 वे खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
उपक्रमांमध्ये विद्यालयामधील विद्यार्थी व शिक्षक हे यशाचे मानकरी ठरले. दिव्यांग प्रतिकृती सनी दिलीप चव्हाण उत्तेजनार्थ ,माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती सारिका शिंदे उत्तेजनार्थ, प्राथमिक गट शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये विद्यालयातील शिक्षिका संध्या संतोष भोसले या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. या यशस्वी विद्यार्थी व यशस्वी शिक्षक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक, व यशस्वी शिक्षिका यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम ,संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड,संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन व सर्व सदस्य तसेच संपूर्ण कुळवंडी ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत यादव शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.