कुडाळ - बाव रस्त्याची दुरवस्था

Edited by:
Published on: December 14, 2024 15:03 PM
views 480  views

कुडाळ  :  कुडाळ - बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. अनेक शाळकरी मुलांना देखील या रस्त्यावरून ये - जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. 

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात देखील घडले आहेत. विशेष म्हणजे वर्क ऑर्डर निघून देखील या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. तेव्हा लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.