
सावंतवाडी : गोव्याच्या सीमेलगत असलेल्या साटेली गावातील श्री देवी माऊली मंदिर, साटेली वार्षिक जत्रौत्सवास १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे. ओटी भरणे,नवस बोलणे आणि नवस फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत. रात्री १२.०० वाजता पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम आणि त्यानंतर लोकराजा कै.सुधीर कलींगण यांचा सुपुत्र सिद्धेश कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य कंपनी, नेरूर – कुडाळ ,या सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध कंपनीचा दणदणीत असा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व भाविकांनी नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साटेली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.