
वैभववाडी : खांबाळे येथील श्री आदिष्टी देवीचा वार्षिक हरिनाम सप्ताह व जत्रोत्सव आज होत आहे. यानिमित्ताने आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते झाले.
खांबाळे येथे आज हरिनाम सप्ताह व जत्रोत्सवानिमित्त भजन महोत्सव होत आहे. श्री.अवसरमोल यांनी श्रीफळ वाढवून सायंकाळी या महोत्सवाचे उद्घाटन केले . यावेळी उपनिरीक्षक श्री.घाग, श्री देवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमितीचे अध्यक्ष एकनाथ पवार, बुवा संजय पवार, उद्योजक अरुण साळुंखे, आनंद पवार, नारायण पवार, सुनील पवार, सत्यवान सुतार, राजेंद्र पवार, राजेंद्र साळुंखे , महेश लांजवळ,दिपक कदम यासह देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवाचा प्रारंभ बुवा संतोष शिरसेकर यांच्या भजनाने झाला. यानंतर भजन महर्षि बुवा विजय परब-देवगड, भजन सम्राट बुवा भगवान लोकरे, मुंबई, लोकप्रिय गायक बुवा उमेश सुतार, (मुंबई)नामवंत बुवा प्रमोद हरयाण (मुंबई), बुवा अजित मुळम (देवगड )यांची सुश्राव्य संगीत भजने होणार आहेत. हा भजन महोत्सव पाहण्यासाठी भजन रसिकांनी मोठी गर्दी केली आहे.