
दोडामार्ग : प्रधानमंत्री आवास योजनेच्या 'ड' यादी मध्ये नाव समाविष्ट करून घरकुल मंजूर करा या मागणीसाठी आज बुधवारी हेवाळे येथील मागासवर्गीय यांनी दोडामार्ग पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते उदय जाधव यांनी सांगितले.
हेवाळे येथील मागासवर्गीय रहिवाशी यांनी दोन वर्षा पूर्वी ग्रामपंचायत हेवाळे - आयनोडे यांच्याकडे घरकुल योजनेसाठी प्रस्ताव दाखल केला होता. सदर उपोषण कर्ते प्रेमानंद सोनू नार्वेकर, भरत तुकाराम गावडे, रुक्मिणी विठोबा नाईक, शोभा सुरेश नार्वेकर, दीपक जाधव यांची राहते घर अगदी पडण्याच्या स्थितीत असून यांनी ग्रामपंचायत कडे अर्ज सादर करून देखील सदर लाभर्थ्यांना प्राधनमंत्री आवास योजनेच्या ड यादी मध्ये नाव समाविष्ट झाले नाही वारंवार मागणी निवेदने करून देखील ग्रामपंचायत व पंचायत समिती दोडामार्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे उपोषणकर्ते जाधव म्हणाले. सदर प्राधानमांत्री आवास योजनेच्या ड यादी मध्ये नाव समाविष्ट होऊन घरकुल मंजूर होत नाही तो पर्यंत आमचे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषण कर्ते उदय जाधव, प्रेमानंद सडेकर यांनी म्हटले आहे.
मरण्याअगोदर तरी
दरम्यान उपोषणकर्ते शोभा नार्वेकर ही महिला म्हणाली की आमच्या घरांची परिस्तिथी बघा, इकडे छप्पर मोडले तर दुसरीकडे भिंतींना पडलेल्या भेगा पाहता कधी मरण येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला मरण येण्या अगोदर तरी या सरकारला जाग यावी एवढीच आमची मागणी आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना विचारणा केली असता मागासवर्गीय यांची यादी मंजूर झालेली आहे. त्या यादीत सदरील उपोषण कर्ते यांची नावे समाविष्ट झालेली नाही. मात्र नवीन यादीत या उपोषण कर्त्यांची नावे समाविष्ट करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.