अपार नोंदणीत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम

Edited by: सिंधुदुर्ग
Published on: December 11, 2024 17:17 PM
views 419  views

सिंधुदुर्गनगरी  : 'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'अपार' नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या क्रमांकावर, तर अहिल्यानगर राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख ६८ हजार ३४ विद्याथ्यर्थ्यांपैकी ८ लाख ७९ हजार ९५ विद्यार्थ्यांची 'अपार' नोंदणी पूर्ण झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही नोंदणी ९०.८६ टक्के एवढी आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमापासून ते कार्यपद्धतीपर्यंत बदल होत आहे. यातीलच 'अपार' हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच 'डिजीलॉकर'ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यास 'ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री' (अझअअठ अपार) असे म्हणतात. युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच 'यू-डायस' पोर्टलमध्ये.'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'अपार' नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या क्रमांकावर, तर अहिल्यानगर राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख ६८ हजार ३४ विद्याथ्यर्थ्यांपैकी ८ लाख ७९ हजार ९५ विद्यार्थ्यांची 'अपार' नोंदणी पूर्ण झाली असून,सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही नोंदणी ९०.८६ टक्के एवढी आहे. तर जिल्ह्यातील अजूनही ८ हजार ८४९ येवढ्या विद्यार्थ्यांची नोंद बाकी राहिली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमापासून ते कार्यपद्धतीपर्यंत बदल होत आहे. यातीलच 'अपार' हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच 'डिजीलॉकर'ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यास 'ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री' (अझअअठ अपार) असे म्हणतात. युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच 'यू-डायस' पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी केली जात आहे. 

असा तयार होणार 'अपार'

'अपार' ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे. 'अपार'साठी यू-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधार कार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे 'यू-डायस' आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी १८ वर्षांखालील असेल, तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची आहे.

मुदतीनंतरही नोंदणी सुरूच

स्थलांतर कुटुंब, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचे अपार नोंदणीसाठी सध्या कोणत्याच सूचना नसल्याचे सांगण्यात आले. तसेच शासन पातळीवरून 'अपार' नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर ही मुदत होती. मात्र, त्यानंतरही नोंदणी सुरू असून, पुढील सूचना मिळाल्या नसल्याचे जिल्हा पातळीवरून सांगण्यात आले.

तांत्रिक अडचणीही...

विद्याथ्यर्थ्यांची 'अपार' नोंदणी करताना एकाच वेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या आधार क्रमांकासह पालकांचे संमतिपत्र भरून घेण्यात येत आहे. यात अडचणी आल्यास 'अपार' नोंदणी होत नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्यास 'अपार'ची नोंदणी फेल असल्याची तक्रार शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे.