सावर्डे विद्यालयात 12 - 13 डिसेंबरला स्नेहसंमेलनाची धूम

Edited by: मनोज पवार
Published on: December 11, 2024 11:50 AM
views 280  views

चिपळूूण : सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 12 व 13 डिसेंबर रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे. 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मांडणी करण्यात आलेल्या विविध प्रदर्शनदालनांचे उद्घाटन सन्माननीय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

या उद्घाटन समारोहास शेखर निकम (आमदार, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ),संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, महेश महाडिक (सचिव, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे) समीक्षा बागवे(सरपंच- सावर्डे)  प्रशांत निकम (उद्योजक) जमीर मुल्लाजी (उपसरपंच सावर्डे)  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम उच्च माध्यमिक विभाग व 12.30 वाजता सकाळ व दुपार सत्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी  पूजा निकम (उपाध्यक्षा, महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेस) आकांक्षा पवार (विश्वस्त -सह्याद्री शिक्षण संस्था) व युगंधरा राजेशिर्के( अध्यक्षा, रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था, रत्नागिरी)यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सर्व शैक्षणिक प्रदर्शन व कार्यक्रमांना संस्थेचे संचालक व शालेय समिती चेअरमन शांताराम खानविलकर संचालक चंद्रकांत सुर्वे व सर्व संचालक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. स्नेहसंमेलनाची पूर्वतयारी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्नेहसंमेलन प्रमुख विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये सहभागी होऊन शिस्तबद्ध पद्धतीने आनंद द्विगुणित करावा असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले आहे.