
सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कुल शैक्षणिक वर्ष 1995-96 इयत्ता बारावी बॅचचा स्नेहमेळावा सावंत फार्म, माडखोल येथे मोठया उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याला एकूण 28 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यात प्रामुख्याने मुंबई, गोवा, खारेपाटण, मालवण आणि सावंतवाडी या विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या. सुरुवातीला सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले. विविध माजी विद्यार्थ्यांनी आपापले कलागूण सादर केले. दुसऱ्या सत्रात संगीत खुर्ची हा कार्यक्रम झाला. त्यात महेश सावंत विजेते ठरले तर उपविजेती म्हणून मंजुषा यांनी मान पटकाविला. त्यानंतर डॅम परिसर फिरून स्नेहमेळाव्याची सांगता झाली.