RPDची स्वरांगी खानोलकर राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: December 10, 2024 18:08 PM
views 231  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या मार्फत कला-उत्सव सन २०२४ - २५ च्या राज्यस्तरीय विविध स्पर्धांसाठी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इ. ११ वी कला शाखेची विद्यार्थिनी स्वरांगी संदीप खानोलकर हिने राज्यस्तरावर नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिची भोपाळ मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या यशस्वीतेसाठी व RPD प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल स्वरांगी तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालक वर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही .बी . नाईक,खजिनदार सी. एल् नाईक, शाळा समितीचे अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जगदीश धोंड,उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ . सुमेधा नाईक, तसेच पालक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .