
चिपळूण : शरदचंद्र पवार उद्यान विद्या महाविद्यालय, खरवते दहिवलीतीमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत शेवंती फुलांची लागवड करण्यात आली आहे. कोकणामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवुन फुलशेती करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या खुप कमी आहे. पण कोकणतील वातावरण हे फुलशेतीस अगदी पोषक आहे. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये फुलशेतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांकडून हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगासाठी शेवंती च्या श्वेता व्हाईट व समृद्धी व्हाईट या जातींची निवड करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे या संशोधनात्मक प्रकल्पासाठी कॅडाॅक्स हडसन इफेक्ट ही संकल्पना राबवण्यात आली आहे . सुमारे 46 एलईडी बल्ब चा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे फुलांची संख्या, आकार,वजन, व आयुष्यमान वाढीस मदत होते व रोपांमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रीया उत्तम रित्या चालु राहते. विद्यार्थ्यांकडून या सर्व रोपांना सुमारे सात ते आठ तास कृत्रिम प्रकाशाचा पुरवठा केला जातो जेणेकरुन फुलांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. ही संपूर्ण फुलशेती मल्चिंग च्या गादि वाक्यांवर साकारण्यात आली आहे. 45 ×45 से.मी अंतरावर सुमारे बाराशे रोपांची लागवड विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. कोकणात मधील हा अनोखा व नावीन्यपूर्ण फुलशेती प्रयोग व त्यांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न शील आहेत. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक प्रकल्पासाठी गौरवोद्गार काढले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्राध्यापिका स्मिता जाधव व डाॅ.ओंकार निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.