
सावंतवाडी : शिक्षणाची आवड आणि जिद्द असल्यास इतिहास घडविता येतो. हेच सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड येथील तांबळडेग गावच्या सारंग कुटुंबातील सदस्या डॉ. अस्मिता मुधोळकर सारंग यांनी दाखवून दिलू असून परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाताना त्यांनी 'बाल संगोपन आणि पोषण आहार विषयक समस्या' या डॉक्टरेट साठी निवडलेला विषयातून दिसून येते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयदेव एकनाथ सारंग यांनी एस. एस. फाऊंडेशन ठाणे आणि समस्त सारंग मुधोळकर कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंताचा गौरव सोहळा ठाणे वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
प्रारंभी जे. डी. चवरे विद्यालय कारंजा जिल्हा वाशिम माजी प्राचार्य अविनाश इंद्रजित मुधोळकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयदेव सारंग आदींच्या हस्ते सरस्वती, कृष्णाजी धोंडू पवार सारंग आदींच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी स्प्रेडिंग स्माइल्स फाऊंडेशनचे संस्थापक प्रदिपकुमार सारंग यांनी सूचित केले की, डॉ. अस्मिता मुधोळकर यांच्या सत्कारां इतक्याच समाजातील गुणवंताचा गौरव करीत असताना संवाद साधावा अशी त्या मागेची संकल्पना होती ती आजच्या दिवशी घडू आली. याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. यावेळी माजी प्राचार्य अविनाश मुधोळकर, डॉ. सुरेश सनये भांडुपच्या नवजीवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रिती सारंग, आदर्श शिक्षक - श्रीकृष्ण राजम आदींनी शुभेच्छापर मौलिक विचार व्यक्त केले.
विविध क्षेत्रात नावलौकिक संपादन केले. गुणवंत सर्वश्री धावपटू प्रशांत सारंग, पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र सनये, कवी मनमोहन रोगे, गझलकार संजना जुवाटकर डॉ. सुरेश सनये, डॉ. सुशांत सनये व श्रीकृष्ण राजम आदींना सन्मानित करण्यात आले यावेळी डॉ. अस्मिता मुधोळकर यांनी सांगितले की ऑस्ट्रेलियात पी एच डीचा अभ्यास सुरु केला त्यावेळी करोनाची साथ सर्वत्र होती. एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे माझ्या बाळाचे संगोपन अशी कसरत सुरु असतांना माझ्या आई-वडिलांचे आशिर्वाद सोबत होते पण माझा नवरा आशय यांची साथ किंबहुना त्यांच्या पुढाकारांनी हे यशस्वी होऊ शकले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तळकोकणात विविध ठिकाणी आजवर सादर करण्यात आलेल्या 'आई मला जन्मास येऊ दे' या यशस्वी कार्यक्रमानंतर प्रथमच ठाण्यामध्ये स्त्रीभृण हत्येवर भाष्य करणारा सौ. रेश्मी रविंद्र कांदळगांवकर यांच्या एकपात्री कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या रंगतदार सोहळयाचे सूत्रसंचालन साहित्यिक गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर यांनी अतिशय मार्मिक शब्दात केले.आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते भाऊ सरवणकर यांनी केले.