
सावंतवाडी : मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर मध्ये रविवार दि.८ डिसेंबर ते गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी 'सग्रह शतचंडी अनुष्ठान'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ७.३० ते १२ वा.धार्मिक कार्यक्रम,दररोज दु.१२.३० वा.महाआरती,दररोज दु.१.०० वा.महाप्रसाद दिला जाणार आहे.
रविवार ८ डिसेंबर दु.२ ते ५ गोवा येथील गायनाचा कार्यक्रम , गायक सचिन तेली.६ ते ७ बुवा सुदीप गावडे यांचे भजन,रा.९. वा.महाआरती.सोमवार ९ डिसेंबर दु.२ ते ५ सुरसंगम गायनाचा कार्यक्रम,गायक हर्षल मेस्त्री,चिन्मय प्रभुराळकर,कौस्तुभ धुरी.५.३० ते ६.३० बुवा रामचंद्र पालव यांचे भजन,६.३० ते ८.१५ घुमट आरती मडगाव,८.१५ महाआरती ,८.३० दत्त माऊली दशावतार नाटक.मंगळवार १० डिसेंबर दु.२ ते ५ स्वरसुधा गायनाचा कार्यक्रम, गायक सौ.अनघा गोगटे,शेखर पणशीकर.५.३० वा.बुवा विनोद चव्हाण यांचे भजन,७.०० वा.बुवा हरिहर नातू यांचे कीर्तन,९.३० वा.महाआरती, बुधवार दि.११ डिसेंबर दु.२ ते ५ भक्तिगीत संगीत रजनी गायनाचा कार्यक्रम,गायक रुपेंद्र परब .५.३० वा.बुवा गौरव पांचाळ यांचे भजन,७.०० वा.कुडाळ व कणकवली येथील महिलांचा आमने सामने फुगडीचा जंगी सामना,९.३० वा.महाआरती, गुरुवार १२ डिसेंबर दु.२ ते ५ स्वरगंध गायनाचा कार्यक्रम, गायक योगेश मेस्त्री, विकास नाईक .५.०० वा. हेदुलवाडी महिला मंडळ फुगडी, ६.०० वा.नक्षत्रांचे देणे गायनाचा कार्यक्रम, गायक दशरथ नाईक,रुपाली खोत,नम्रता जोशी.७.३० वा.वारकरी भजन वेंगुर्ला.९.३० वा.महाआरती.तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळाने केले आहे.