सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला 10 फॅन

राजू मसूरकर यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 15:45 PM
views 172  views

सावंतवाडी : जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्यासह सहकारी मित्रांमार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी दहा पेडस्टल फॅन भेट देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग चालू करण्यात आला आहे. त्यामध्ये सेंट्रल एसी असल्याने बंद पडल्यास रुग्णांना त्रास सहन करावा लागणार नाही या उद्देशाने त्यांनी रुग्णसेवेसाठी हे दहा फॅन उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिले.

जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले माजी नगरसेवक राजू मसुरकर हे रुग्णसेवेत गेली २४ वर्षे सातत्याने कार्यरत असून उपजिल्हा रुग्णालयातील सर्व गैरसोयी तसेच अन्य बाबीवर त्यांचा बारकाईने लक्ष असतो. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ते जातीने त्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेत असतात. याच पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्याच्या दिवसात रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांनी हे पेडस्टल फॅन उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.