
देवगड : देवगड पंचायत समितीती कर्यालय येथील सिलिंग अचानक कोसळल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. ही घटना गुरुवारी ३ वा. दुपारच्या वेळी घडली.
देवगड पंचायत समितीच्या कौलारू इमारतीमधील अंतर्गत सुशोभीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यावेळी इमारतीच्या छताला पूर्णता सिलिंग चे काम करण्यात आले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मांजराने उडी मारण्याचे निमित्त झाले आणि या छताचा काही भाग पूर्णता खाली कोसळला. कावळा बसायला आणि फांदी मोडायला असा काहीसा प्रकार यावेळी घडला असल्याचे बोलले जात आहे. यावरून या कामाचा दर्जा काय असेल असा सवाल देखील उपस्थितांकडून केला जात आहे. मात्र यामध्ये दुपारची वेळ असल्यामुळे कार्यालयात कमी प्रमाणात कर्मचारी असल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही.