
खेड : तालुक्यातील चाकाळे येथे महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवात यावर्षी देखील उत्साह पाहायला मिळणार आहे. श्रीमहालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला गुरुवार दि.५ डिसेंबर पासूनच सुरुवात झाली असून यानिमित्त महालक्ष्मी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सुंदर फुलांनी मंदिर सजवण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवानिमित्त सोमवारी ०९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० - देवीला अभिषेक , सकाळी १० ते ११ - देवीला अलंकार साज चढवणे , दुपारी १२ ते २ - देवीचे दर्शन , नवस करणे आणि नवस फेडणे , दुपारी २ ते ३ - चाकाळे भजन मंडळाचा हरिपाठ , सायं ५ ते ७ - चौक भरणे ,दिवटी प्रज्वलित करणे आणि गोंधळ होणार आहे तसेच सायंकाळी ०७ ते १० यावेळेत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. आणि रात्री मनोरंजनात्मतक कार्यक्रम कोल्हापूर येथील सारेगमप आर्केस्ट्रा व " पैशापोटी हि माया खोटी " या नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या सुहासिनी उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन चाकाळे ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व मुंबई, ठाणे ,पुणे व महिला मंडळ चाकाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.