
दोडामार्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग पंचायत समिती दोडामार्ग शिक्षण विभाग व श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दोडामार्ग इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले.
विद्यार्थी निर्मित प्रतिकृती प्राथमिक गट मध्ये कुमार गजानन श्रीकांत राणे - प्रथम क्रमांक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कुमार अभिषेक तळणकर प्रथम क्रमांक, माध्यमिक शिक्षक निर्मिती साहित्य आनंदा लक्ष्मण बामणीकर प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गट कुमारी चिन्मयी जयसिंग खानोलकर प्रथम क्रमांक, प्रश्नमंजुषा स्पर्धा माध्यमिक गट कु. अथर्व संदीप गवस व अनया संतोष गवस प्रथम क्रमांक, निबंध लेखन स्पर्धा प्राथमिक गट दक्षता बाबुराव घोगळे द्वितीय क्रमांक व माध्यमिक गट कुमार अभिषेक तळणकर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डाॅ दिनेश नागवेकर, खजिनदार सी एल नाईक, सचिव व्ही बी नाईक, मुख्याध्यापक प्रल्हाद महादेव सावंत, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक संघ व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.