
दोडामार्ग : दोडामार्ग तहसीलदार कार्यालय अर्थात तालुका मुख्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर छताचा काही भाग आज कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या बांधकामाच्या ढिसाळ कामाचा पुन्हा एकदा पंचनामा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घंटे व त्यांच्या टीमने पाहणी केली व तात्काळ या इमारतीच्या छताची डागडुजी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी येथील तहसीलदार कार्यालय अर्थात तालुका मुख्यालयामध्ये सकाळपासूनच अनेकांची आपल्या दैनंदिन कामकाजासाठी ये - जा सुरु झाली होती. या मुख्यालय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आधार कार्ड केंद्र, व तालुका कृषी कार्यालय तालुका भूमि अभिलेख कार्यालय दुय्यम निबंधक तसेच दोडामार्ग तलाठी तसेच पुरवठा शाखा ही महत्त्वाची कार्यालय आहेत. आज या ठिकाणी तुरळक लोकांची ये जा चालू होती. अशातच आधार केंद्र व मुद्रांक विक्रेते नजीकच्या सज्जामध्ये असलेल्या वरील छपराचा काही भाग कोसळला या ठिकाणी मुद्रांक विक्रेते त्यांचे सहाय्यक तसेच काही नागरिक होते. छतावरील अनेक खपल्या सोडून खाली पडल्यास निदर्शनात येताच सर्वांनी तिथून पळ काढला.. त्यानंतर या इमारतीच्या बांधकामावर सर्वांनी संतापही व्यक्त केला. ही बातमी कानावर जातात उबाथा सेनेचे युवा तालुका प्रमुख मदन राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता श्री घंटे यांना तातडीने या ठिकाणी बोलावून पाहणी केली. त्यांनाही उपस्थित नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. यावेळी माटणे सरपंच महादेव गवस, नामदेव गवस आदी उपस्थित होते.
लवकरच इमारत डागडुजी करु : अभियंता घंटे
दरम्यान तहसीलदार इमारत पहिल्या मजल्यावर छताचे काही तुकडे पडल्याने पाहणी साठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम चे अभियंता घंटे यांनी इमारतीची पाहणी केली व लवकर याचे टेंडर काढून इमारत डागडुजी करण्यात संदर्भात कार्यवाही करु असे त्यांनी सांगितले.