देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतप्रा.श्याम सायनेकर यांचे करिअर गायडन्सवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. करिअर गायडंस या विषयावर ते बोलताना म्हणाले दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जास्त ओढा हा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे जास्त असल्याने कला शाखेकडे जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा कल फारच कमी असल्याने एम.पी.एस.सी., व यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे मत डोंबिवली येथील नामवंत पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.श्याम महादेव सायनेकर यांनी व्यक्त केले.
एम.पी. एस.सी.,व यु.पी.एस.सी.ला विचारले जाणारे बहुसंख्य प्रश्न हे कलाशाखेशी जास्त निगडीत असल्याने त्यांच्या पदवी पर्यंतचा पाया मजबूत नसल्यानेच मुलांच्या पदरी निराशा येते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी संतोष किंजवडेकर, मुख्याध्यापक सुनील जाधव, श्रीकांत किंजवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.श्याम सायनेकर हे दिव्यांग असून त्यांनी अंधत्वावर मत करून ब्रेल लिपीच्या माध्यमातून एम.ए.,एल.एल.बी.,एल.एल.एम.,एम.फिल.,एल.एल.डी.,अशा उच्च पदव्या संपादन केल्या.आपण धडधाकट असताना शिक्षणाच्या बाबतीत अनेक करणे पुढे करतो पण श्याम सायनेकर सारखा धेय्यवेडा दिव्यांग सर्व अडथळ्यांवर मात करून स्वतःची प्रगती कशी साधतो,त्याचा जीवनाबरोबरचा संघर्ष नेमका कसा आहे हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी श्याम सायनेकर यांचे प्रशालेत व्याख्यान आयोजित केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले. या वेळी संतोष किंजवडेकर व.श्रीकांत किंजवडेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. आभार सतीश करले यांनी मानले. करिअर गायडन्स वर मार्गदर्शन करताना श्याम सायनेकर पुढे म्हणाले की ,एखाद्या शाखेला ॲडमिशन घ्यायच्या आधीत्याची कल चाचणी घेऊन तशा प्रकारच्या शिक्षणक्रमात प्रवेश घ्यायला हवा. विद्यार्थ्यानी मी काय करू शकेन याचा शोध घ्यावा. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा.क्वॉलिफिकेशन महत्वाचे नसून तुम्हाला कोणते स्किल येते हे महत्वाचे आहे, असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.