सावंतवाडी : देशातील तंत्रज्ञानामध्ये नविन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती व्हावी या हेतूने पंचायत समिती सावंतवाडी यांच्याकडून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ चे आयोजन आंबोली पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज तर्फे कु. तन्वी प्रसाद दळवी हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत कचरा व्यवस्थापन या विषयावरील वक्तृत्वसाठी अस्मी प्रवीण मांजरेकर हिने द्वितीय क्रमांक तसेच सोहम कोरगावकर - तन्वी दळवी यांच्या गटाने प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
मोठ्या गटात कु. प्राची सावंत हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. या यशस्वितेसाठी, प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल चारही विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , पर्यवेक्षक एस . एन पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , तसेच पालक ,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.