चिपळूण : येथील डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने सात दिवसांचे श्रमसंस्कार निवासी शिबिर मौजे चिंचघरी(गणेशवाडी) येथे संपन्न होत आहे.
या शिबिरादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी दिनांक १ व २ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंचघरी शेजारील नदीवर २५ फूट लांब बंधारा बांधला. दोन दिवस अविरत मेहनत घेत बांधलेल्या बंधाऱ्यात झालेला जलसाठा पाहून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली.पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे व या पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जलसंवर्धन ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. विद्यार्थी शिबिरा दरम्यान पथनाट्यातूनही जल सुरक्षेचा संदेश देत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या बळावर बंधारा बांधून पथनाट्यातून दिल्या जात असलेल्या जलसंवर्धनाच्या संदेशाला कृतीची जोड देण्याचा प्रयत्न केला. चिंचघरी गावचे सरपंच श्री.राजेश चाळके, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. दिनेश चाळके, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी कृषी सहाय्यक श्री. संतोष जाधव, कृषी पर्यवेक्षक संतोष भोसले, रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष प्रा. अविनाश पालशेतकर, मंगेश गोंधळेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, सल्लागार प्रा. स्वप्निल साडविलकर, प्रा. विनायक बांद्रे, दीक्षा दाभोळकर, प्रा. सिद्धी साडविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
हा बंधारा बांधण्यासाठी साईराज बुरुंबाडकर, आर्यन रेडीज, गौरेश सुर्वे, प्रेम बुरुंबाडकर, जय जाधव, श्रेयश बामणे, क्रिश गमरे, सनिष कोळवणकर, वेदांत बांद्रे, वेदांत साबळे, पार्थ जुवळे, चिन्मय जुवळे, रोहित काताळे, ऋतांश कदम, प्रतीक साळवी, सक्षम जाधव, अथर्व कासेकर, वेदांत देसाई, जोहा ममतुले, निशा आडविलकर, रिया खराडे, रिया खातू, आर्या भैरवकर, हिमानी खेडेकर, जिया जड्याळ, प्रियंका जंगम, नेहा कांबळे आदी स्वयंसेवक सहभागी होते.