वैभववाडी : असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ऐनालिस्ट अँड प्रॅक्टिसनर (ACLAPअक्लाप) या महाराष्ट्र राज्यव्यापी लॅबोरेटरी धारकांच्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी वैभववाडीचे प्रशांत गुळेकर व सचिव पदी रमेश चौगुले (कोल्हापूर)यांची बिनविरोध निवड झाली. या संघटनेची नाशिक येथे राज्य कार्यकारिणीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली.
कै . अण्णासाहेब करोले यांनी स्थापन केलेली अक्लाप ही राज्यव्यापी संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लॅब धारकांच्या न्याय हक्कांसाठी लढत असलेली सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेची संपूर्ण महाराष्ट्रातून नुकतीच २१ जिल्हा अध्यक्षची राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर नूतन कार्यकारिणी बैठक शिर्डी येथे पार पडली. यामध्ये राज्यातील २१प्रतिनिधी निवडण्यात आले. त्यानंतर संघटनेची नव्याने राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात आली.
ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष: प्रशांत गुळेकर (वैभववाडी), सचिव: रमेश चौगुले (कोल्हापूर) उपाध्यक्ष: गणेश बोंधारे (नांदेड), खजिनदार : उमेशचंद्र सोनार (नंदुरबार) तर सहसचिव पदी राजेश गरुड (परभणी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिका-यांच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अक्लाप संघटनेच्या पदाधिकारी निवडीत कोकण विभागाला प्रथमच स्थान मिळाले असून प्रशांत गुळेकर हे राज्याध्यक्ष झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे. या निवडीसाठी धनंजय डबीर (नाशिक), कुमार पाटील (अहिल्या नगर), रघुनाथ भोंगळे (पुणे), अनिल राठी (संगमनेर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.