
सिंधुदुर्ग : कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिकांना घरकुल योजना, घर दुरुस्ती योजना यापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भात अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांची कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा गटनेता, नगरसेवक विलास कुडाळकर यांनी भेट घेतली. यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून योग्य तो मार्ग काढला जाईल असे सांगितले.
अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड धर्मपाल मेश्राम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेतला. दरम्यान कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, गणेश भोगटे यांनी ओरोस येथे त्यांची भेट घेतली. विविध विषयावर चर्चा केल्यानंतर भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे देवस्थान इनाम जमिनीमध्ये असलेली या नगरामधील नागरिकांच्या घरांसंदर्भात चर्चा केली. शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ या नागरिकांना मिळत नाही. तसेच शासनाचे विविध योजना आहेत. ज्या योजना केवळ या देवस्थान जमिन असल्यामुळे राबत नाहीत. याबाबत चर्चा केल्यानंतर आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी या विषयासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून कोणत्या प्रकारे उपाययोजना करता येईल याकडे लक्ष देऊ असे सांगितले. तसेच अनुसूचित जाती, जमाती संदर्भातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
फोटो:- अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांना निवेदन देताना विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे