सह्याद्री शिक्षण संस्था स्थापना दिन

संस्थांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
Edited by: मनोज पवार
Published on: December 01, 2024 19:38 PM
views 159  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचा इतिहास गौरवशाली असून ग्रामीण भागातील बहुजनांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेच्या स्थापनेपासूनच संस्थापक स्व.गोविंदरावजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अविरतपणे सुरू आहे. कोकणातील एक नामवंत शिक्षण संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक ते ज्ञान देण्याचा अट्टाहास आमदार शेखर निकम यांचा असतो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील प्रत्येक घटक हे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे असे उद्गार अध्यक्ष बाबासाहेब भुवड यांनी काठले.स्पर्धेला शुभेच्छा देताना अनिरुद्ध निकम यांनी खेळाडूंना विविध खेळ खेळण्याची संधी मिळावी, खेळाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते असे सांगितले.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे च्या भाऊसाहेब महाडिक सभागृहामध्ये संस्थांतर्गत बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, संचालक  मारुतीराव घाग ,मानसिंग शेठ महाडिक, संचालिका श्रीमती आकांक्षा पवार ,सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते .बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन तीन गटांमध्ये करण्यात आले होते . इयत्ता ५वी ते ७वी मुले मुली, या गटामध्ये 26 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गट क्रमांक दोन इयत्ता ८वी ते १०वी मुले मुली, या गटामध्ये एकूण 91 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गट क्रमांक तीन संस्थेतील पुरुष व महिला कर्मचारी, यामध्ये 31 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी माजी सभापती सौ पूजाताई निकम , संस्थेचे सचिव महेश महाडिक व अनेक पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले. 

बुद्धिबळ स्पर्धा सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्य व नॅशनल पंच  निलेश साळवी आणि त्यांचे सहकारी साहस नारकर यांचे सहकार्य लाभले. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे चे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे व उपमुख्यद्यापक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आणि शावजीराव  लक्ष्मणराव निकम  माध्यमिक विद्यालय कोसबी फुरुस चे मुख्याध्यापक व सह्याद्री शिक्षण संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख  उदयराज कळंबे यांच्या नियोजनानुसार स्पर्धा संपन्न झाल्या.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे इयत्ता ५वी ते ७वी मुले वेदांत पाटील प्रथम (सती इंग्लिश मीडियम) समर्थ लाड द्वितीय (सावर्डे इंग्लिश मीडियम) निरज इनामदार तृतीय (सावर्डे हायस्कूल) इयत्ता ५वी ते ७वी मुली यशिका शिंदे प्रथम (पाग इंग्लिश) मनस्वी चव्हाण द्वितीय (खेर्डी हायस्कूल) तन्वी राऊत तृतीय (खेर्डी  हायस्कूल) इयत्ता ८वी ते १०वी मुले आयुष करंडे प्रथम (वाशी हायस्कूल) कुशल नरेवाडी द्वितीय (खेर्डी हायस्कूल) गणेश कंदकल तृतीय (सावर्डे इंग्लिश) इयत्ता ८वी ते १०वी मुली इच्छा भिंगे प्रथम (सती इंग्लिश) सप्तश्री आग्रे द्वितीय (टाळसुरे हायस्कूल) सृष्टी जाधव तृतीय (आंबडस हायस्कूल) पुरुष कर्मचारी गट अर्शद शेख प्रथम  (कृषी कॉलेज खरवते )उदय महाबळ द्वितीय (कृषी कॉलेज खरवते ) मदन पोमाजे तृतीय (सावर्डे फार्मसी कॉलेज) कर्मचारी महिला गट श्रद्धा सावर्डेकर प्रथम (सावर्डे हायस्कूल) रूपाली भुवड द्वितीय (खेर्डी हायस्कूल) हर्षाली पाकळे तृतीय (तोंडली हायस्कूल)विविध शाळांमधील क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले.