
सावंतवाडी: संत बाळूमामा भक्त परिवार ,बांदा यांच्यावतीने ३ डिसेंबर रोजी बांदा ते आदमापुर संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा तीन दिवस चालणार असून 5 डिसेंबर रोजी आदमापूर येथे पोहोचणार आहे .
6 डिसेंबर रोजी आदमापुर येथे महाप्रसादाचा लाभ घेऊन गाडीने बांद्याला परत यायचे आहे. या पदयात्रेमध्ये पदयात्रींचे जेवण नाश्ता राहण्याची व्यवस्था तसेच परत येण्याची व्यवस्था आदींचा सर्व खर्च ज्ञानेश्वर सावंत यांच्या पुढाकारातून माजी नगराध्यक्ष,सावंतवाडी संजू परब यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या 3 तारखेला बांदा पदयात्रा मंडळाची अन्यत्र वार्षिक पदयात्रा नाही त्यामुळे इच्छुक पदयात्रींनी या आदमापुर पदयात्रेत सहभागी व्हावे असे अध्यक्ष उमेश मयेकर यांनी सांगितले आहे. जास्तीत जास्त पदयात्रींनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन संत बाळूमामा भक्त परिवार बांदाच्या वतीने ज्ञानेश्वर सावंत यांनी केले आहे .