
सावंतवाडी : आंबोली सैनिक स्कूल येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्राथमिक गटात 'विद्यार्थी प्रतिकृती तयार करणे' यामध्ये आयुष ऋषिकेश गावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला आणि त्याची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
माध्यमिक गटात 'प्रश्नमंजुषा'स्पर्धेत प्रणव सोमदत्त सावंत आणि ओवेस जियाउद्दीन खातीब यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. नववी ते बारावी माध्यमिक गटात 'शिक्षक प्रतिकृती'मध्ये जयवंत तायशेटे यांना प्रथम क्रमांक प्राप्त होऊन त्यांची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी झाली.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रशालेचे प्राचार्य फा. रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यासमयी प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.