
देवगड : देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय 'शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा प्रार्थमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन लोकल कौन्सिलच्या उपाध्यक्षा अर्चना नेने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी चंद्रकांत शिंगाडे, अनुश्री पारकर , परीक्षक डॉ सर्जेराव गर्जे भालचंद्र मुणगेकर माजी मुख्याध्यापक संजीव राऊत पर्यवेक्षिका सौ निशा दहिबावकर इ मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांना उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य तयार केलेले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. सर्जेराव गर्जे (माजी प्राचार्य बीएड कॉलेज देवगड) आणि भालचंद्र मुंबरकर प्राचार्य बीएड कॉलेज देवगड) यांनी केले.
या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम कावेरी बंडगर (जि. प. पूर्व प्राथमिक शाळा दहिभाव नं 1 ), द्वितीय भूषण दत्तात्रय दातार. (अ. कृ. केळकर हायस्कूल वाडा) तृतीय, वैशाली विश्वास केळकर (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा दहिबाव नं 1) यांना रोख रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. या स्पर्धेत दहिबाव नं१ तारा मुंबरी, देवगड हायस्कूल ,वाडा हायस्कूल , मी स पवार प्राथमिक शाळायेथील शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
परीक्षक डॉ.सर्जेराव गर्जे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डिजिटल साहित्य महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. स्पर्धक प्रवीण व्यापारी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले हे शैक्षणिक साहित्य बनवताना आपल्याला वेगळाच आनंद मिळाला तसेच तसेच साहित्य निर्मिती करताना येणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती धुरी यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.