वैभववाडी : शहरात पुर्वेकडील भागात सुरू असलेलं काम उबाठाचे नगरसेवक रणजित तावडे यांनी रोखले.संबधित काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असा आरोप श्री तावडे यांनी केला आहे. हा प्रकार आज सकाळी झाला असून अभियंत्यांच्या देखरेखीशिवाय काम करु नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
शहरातील दुसऱ्या टप्प्यातील गटाराच काम सुरू आहे. सावली हॉटेल ते साई हॉटेल पर्यंत सिमेंट कॉक्रीटचे हे काम आहे. मात्र हे काम करीत असताना ठेकेदाराने नारायण वडापाव सेंटर नजीक असलेल्या भागात सोलींग न करता त्यावर पीसीसी केलंल आहे. ही बाब श्री तावडे यांच्या येथील नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबविले. अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात यावं. अशी भूमिका तावडे यांनी घेतली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून या संपूर्ण कामाची गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करून चौकशीची मागणी करणार असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले.
याबाबत ठेकेदार अमेय दर्डे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, काम अंदाजपत्रकाप्रमाने अभियंता, नगरपंचायत यांचे निरीक्षणाखाली करण्यात आलेले आहे. केलेल्या प्रत्येक कामाचे फोटो उपलब्ध आहेत. तसेच काम प्रगतीपथावर असुन सदरहु ठिकाणी उत्खननात माोठा दगड लागलेला आहे. त्याच ठिकाणी सोलींगविरहीत पीसीसी केली होती .इतर सर्व मातीच्या भुभागावर सोलिंग करण्यात आले असून ते अंदाजपत्रकाप्रमाणेच केले आहे.आता अभियंता यांनी पहाणी केल्यानंतर सदर काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत व्यापारी व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.