
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आजवर अनेक लोकाभिमुख योजना मंजूर करून आणल्या आहेत. राज्यातील ते एक प्रामाणिक कॅबिनेट मंत्री आहेत. अजित पवार यांच्यासह अर्थ खात्याचा कारभार त्यांनी हाताळला आहे. राज्याचे बजेट सादर केले आहे. त्यांचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आजवर अनेक लोकाभिमुख योजना मंजूर करून आणल्या आहेत. शिरशिंगेच रखडलेल धरण, तिलारी वेंगुर्ला नळपाणी पाणीपुरवठा, फुकेरी धरणाला निधी देऊन काम सुरू केली. वेर्ले, उडेली धरण, सिंधुरत्न योजनेतून ग्रामीण भागात विकासकाम केली. कबुलायतदार गांवकर प्रश्न मार्गी लावला. राज्यातील ते एक प्रामाणिक कॅबिनेट मंत्री आहेत. अजित पवार यांच्यासह अर्थ खात्याचा कारभार त्यांनी हाताळला आहे. राज्याचे बजेट सादर केले आहे. सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे असून त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, ऑगस्तीन फर्नांडिस, संदीप पेडणेकर, सत्यवान गवस आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.