देवगड पोयरेतील उबाठा सेनेची पूजा मयेकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 16, 2024 19:58 PM
views 147  views

देवगड : देवगड पोयरे येथील उ.बा.ठा सेनेची पूजा नरेश मयेकर - महिला संघटक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असून पूजा नरेश मयेकर (उबाठा महिला संघटक, पोयरे), नरेश तुळशीदास मयेकर,आणि संदीप सुरेश मुणगेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. 

भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण आमदार नितेश राणे यांचे काम, कार्यपद्धती आणि विकासाची दृष्टी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी उबाठा संघटनेवर टीका करत म्हटले की, "उभाठामध्ये आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही."या प्रसंगी माजी सरपंच संदीप घाडी, माजी उपसरपंच भरत राणे, विकास मेस्त्री, संतोष घाडी, विद्यमान उपसरपंच समीर तावडे, आणि अनिल रुपये आदी  उपस्थित होते.