
सावंतवाडी : कोलगाव येथिल ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 17 नोव्हेंबर 2024 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
या निमित्त मंदिराला फुलाची सजावट आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी सातेरी देवतांची पुजा त्यानंतर श्री सातेरीची आर्कषक स्वरूपात पुष्पपुजा दुपारी मानाचे नैवेद्य तसेच सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्रो 12 वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीतसह मंदिराभोवती पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. व रात्री 1 वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे . भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.