
सावंतवाडी : येथील सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला ए निगेटिव्ह या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाची अतितातडीने गरज होती. ही बाब सावंतवाडी येथील एच डी एफ सी बॅंक कर्मचारी नबीला हेरेकर यांना समजताच त्यांनी स्वतःहून रुग्णाच्या नातेवाइकांना संपर्क साधला व रक्तदान करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
रात्री ९.३० वाजता ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी रक्तदान केले. सौ. नबीला हेरेकर यांनी नारी शक्तीचे एक उदाहरण समाजासमोर मांडत रक्तदान हे श्रेष्ठ दान हा संदेश दिला आहे.