सावंतवाडीत 15 नोव्हेंबरला रंगणार 'हे चांदणे फुलांनी'

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 17:34 PM
views 316  views

सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त "हे चांदणे फुलांनी..." (वर्ष 7 वे) जुन्या - नव्या हिंदी व मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.15 नोव्हेंबरला सायंकाळी ठीक 6 वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन) येथे ही मैफिल रंगणार आहे. 

             

हा कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाचे  वर्षा देवण-धामापुरकर, सिद्धी परब, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, निधी जोशी, पूजा दळवी, नेहा दळवी, मानसी वझे, अनामिका मेस्त्री, सानिका सासोलकर, नितीन धामापुरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, मनिष पवार, चिन्मयी मेस्त्री, अलीशा मेस्त्री, मुग्धा पंतवालावलकर, ऋतुजा परब, श्रेया म्हालटकर, स्नेहल बांदेकर, कर्तव्य बांदेकर, विभव विचारे हे विद्यार्थी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री व  (हार्मोनियम) , श्री किशोर सावंत, कु निरज मिलिंद भोसले व कु सिद्धेश सावंत (तबला), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री, (सिंथेसायझर) कु. दुर्वा किशोर सावंत (गिटार) व सूत्रसंचालन श्री संजय कात्रे करणार असून ध्वनी संयोजन J.S.Sound आंदुर्ले यांचे आहे. श्री. निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे. सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी,सद्गुरु संगीत विद्यालय, पालकवर्ग व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.